मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 08:42 AM2020-10-02T08:42:55+5:302020-10-02T08:46:10+5:30

Ajit pawar talk on Parth Pawar's Tweet: अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले.

I don’t have only that work; Ajit Pawar's reaction on Parth Pawar's tweet | मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

googlenewsNext

पुणे : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. याचबरोबर पार्थ पवार यांच्या ट्विटवरूनही अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. 


अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्य़ात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले. 


राहुल गांधी यांच्या तिथे जाण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असे नाही.  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडीतेच्या कुटुंबाला भेटू दिलं पाहिजे. कारण संसद असेल किंवा विधानसभा, तो विषय मांडण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते, असेही अजित पवारांनी सांगितले. 



पार्थ पवार बाबत काय बोलले?
पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणावरील ट्विटबद्दल छेडले असता अजित पवार यांनी मला तेवढाच उद्योग नाहीय, असा संताप व्यक्त केला. सुप्रीया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची ती भुमिका नाही.  आता अलिकडची मुलं काय काय ट्वीट करतात. प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केले, तुमच्या मुलानं ते ट्वीट केले, तेवढाच मला उद्योग नाहीय. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

Read in English

Web Title: I don’t have only that work; Ajit Pawar's reaction on Parth Pawar's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.