Swargate Case: तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले अशी माहिती मी कोर्टात दिलीच नव्हती; वकिलाचा खोटेपणा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 20:04 IST2025-03-12T20:04:04+5:302025-03-12T20:04:32+5:30

न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलिस कारवाई करणार का?

I did not inform the court that the swargate accused had given Rs 7500 to the girl Lawyer statement in Swargate case | Swargate Case: तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले अशी माहिती मी कोर्टात दिलीच नव्हती; वकिलाचा खोटेपणा समोर

Swargate Case: तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले अशी माहिती मी कोर्टात दिलीच नव्हती; वकिलाचा खोटेपणा समोर

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगार बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट् हादरून गेला आहे. या प्रकरणानंतर महिलानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात तब्बल ७२ तासांनी अटक केलेल्या गाडेने पोलिसांची अनेक वेळा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आता तर त्याच्या वकिलांनी सुद्धा तरुणीच्या एका वक्तव्याबाबत सारवासारव केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीवर अत्याचार झाले तिच्याबद्दल चुकीची माहिती वकिलानेच प्रसारमाध्यमांना दिल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाहीतर, जेव्हा या वकिलाला विचारलं चुकीची माहिती का दिली, तर त्याने पळ काढला आहे.  

पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला आज पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गाडे याचे वकील सुमित पोटे यांनी याप्रकरणातील पीडित तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी कबुली आज दिली. या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी, पोटे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना आरोपीने पीडित तरुणीला पैसे दिले होते अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती.

आज सुनावणी नंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ७५०० रुपयांचा कुठला ही युक्तिवाद न्यायालयासमोर झाला नसल्याची कबुली दिली. कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो अशी सारवासारव गाडे याचे वकील पोटे यांनी केली. एक वकील म्हणून असं बेजबाबदार वक्तव्य करणं संयुक्तिक आहे का असा प्रश्न माध्यमांनी त्यांना आज विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणे टाळून तिथून काढता पाय घेतला आणि या प्रकरणी सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देऊ असं सांगितलं. यामुळे ७५०० रुपयाचा विषय न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलिस कारवाई करणार का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. 

Web Title: I did not inform the court that the swargate accused had given Rs 7500 to the girl Lawyer statement in Swargate case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.