'मी महादेवाचा अवतार', म्हणत महिलेवर अत्याचार, नराधम भोंदू ऋषिकेश वैद्यला अखेर पिंपरीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:59 IST2026-03-28T10:58:43+5:302026-03-28T10:59:37+5:30

एका विवाहित महिलेची ऋषिकेश वैद्यशी २ वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात फेसबुकवर ओळख झाली होती, या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने महिलेवर अत्याचार केला

'I am the incarnation of Mahadev', said to have tortured a woman, the man-killing impostor Rishikesh Vaidya was finally arrested from Pimpri | 'मी महादेवाचा अवतार', म्हणत महिलेवर अत्याचार, नराधम भोंदू ऋषिकेश वैद्यला अखेर पिंपरीतून अटक

'मी महादेवाचा अवतार', म्हणत महिलेवर अत्याचार, नराधम भोंदू ऋषिकेश वैद्यला अखेर पिंपरीतून अटक

पुणे : नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच मांजरी येथे एका भोंदू बाबाचा कारनामा उघड झाला आहे. फेसबुकवरील ओळखीतून नाते निर्माण करीत  एका विवाहितेवर अत्याचार केला आहे. या भोंदूवर मांजरी बुद्रुक येथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश वैद्य (रा. वसई) असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याला आता अटक करण्यात आली आहे. पिंपरी परिसरातून पोलिसांनी या भोंदू ऋषिकेशला ताब्यात घेतले आहे.  

एका विवाहित महिलेची भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याच्याशी दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित ऋषिकेश वैद्य याने मी महादेवाचा भक्त असून महादेवाची उपासना कशी करायची हे शिकवतो, "मी महादेव आणि तू पार्वती" असे सांगून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला.

संबंधित महिलेला या गोंधणी मांजरी परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला गुंगी येणारे पेय देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा वसईच्या हॉटेलमध्ये बोलावले. तेथेही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणानंतर हिम्मत आलेल्या या महिलेने ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात माणिकपूर पोलिस स्टेशन, वसई येथे झिरो नंबरने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करून येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title : देवीय होने का दावा करने वाले नकली बाबा को बलात्कार के आरोप में गिरफ़्तार

Web Summary : ऋषिकेश वैद्य नामक एक ढोंगी बाबा को एक विवाहित महिला के साथ बलात्कार करने के आरोप में पिंपरी से गिरफ्तार किया गया। उसने शिव का अवतार होने का दावा करके महिला का विश्वास जीता और उसका शोषण किया। नाशिक में एक समान मामले के बाद पीड़िता ने साहसपूर्वक दुर्व्यवहार की सूचना दी।

Web Title : Fake godman arrested for raping woman after claiming divine status.

Web Summary : Rishikesh Vaidya, posing as a godman, was arrested in Pimpri for raping a married woman. He gained her trust by claiming to be an avatar of Shiva and exploited her. The victim bravely reported the abuse after a similar case in Nashik.