The husband tortured and beat his wife mentally and physically | पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून केली मारहाण

पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून केली मारहाण

ठळक मुद्देपतीसहित सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

बाभुळगाव: स्वयंपाक चांगला करता येत नाही, व लग्नात व्यवस्थित मानपान दिले नाही. अशा किरकोळ कारणांवरून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं.2 येथे घडली आहे. याविरोधात पती आणि सासू - सासरे यांच्याविरोधात इंदापूरपोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पती अतुल तुकाराम एकतपुरे, सासरे तुकाराम रामचंद्र एकतपुरे व सासु भामाबाई तुकाराम एकतपुरे( सर्व.रा.अकलुज- माळवाडी, ता. माळशिरस,जि.सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून जयश्री अतुल एकतपुरे रा इंदापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

२६ नोव्हेंबर २०१४ ला दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर एक वर्षभर यांचा संसार सुखात चालला होता. त्यानंतर पत्नीला स्वयंपाक चांगला करता येत नाही, लग्नात तुझ्या वडीलांनी व्यवस्थित मानपान दिले नाही. या कारणावरून पती, सासु, सासरे यांनी मानसिक व शारीरीक त्रास देण्यास सुरुवात केली. सासु सासऱ्यांचे ऐकून पती हे दारू पिऊन घरी येत असे. पत्नीला त्रास देऊन मारहाण करत असे. दरम्यान त्यांना एक अपत्यही झाले नाही. ९ नोव्हेंबर २०२०ला पतीने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून संध्याकाळी घरातून हाकलून दिले.  त्यानंतर या वडीलांकडे राहत होत्या. ८ एप्रिल २०२१ ला पती रात्री उशीरा दारूच्या नशेत वडिलांच्या घरी गेला. त्यानंतर पत्नी आणि आई वडीलांना  लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मड्डी हे करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The husband tortured and beat his wife mentally and physically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.