पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे पतीने केला मित्राचा खून; सिंहगड रोड परिसरातील घटना

By किरण शिंदे | Updated: June 17, 2025 20:01 IST2025-06-17T20:01:24+5:302025-06-17T20:01:55+5:30

ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Husband kills friend for using abusive language towards wife; Incident in Sinhagad Road area | पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे पतीने केला मित्राचा खून; सिंहगड रोड परिसरातील घटना

पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे पतीने केला मित्राचा खून; सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे - पत्नीविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एकाने आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली आहे. घरातील बादली व चाकूचा वापर करत आरोपीने मित्रावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव अनिल अशोक जाधव (वय अंदाजे ३५) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अनिल जाधव यांच्या पत्नी विषयी मयत व्यक्तीने अशोभनीय व अपशब्द वापरले. यामुळे अनिलला अत्यंत राग आला आणि त्याने रागाच्या भरात घरातच ठेवलेल्या बादलीने मित्रावर हल्ला चढवला. त्यानंतर चाकू घेऊन मित्रावर वार करत त्याचा खून केला.

ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Husband kills friend for using abusive language towards wife; Incident in Sinhagad Road area