पतीनेच केले पत्नीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक; अनैतिक संबंधाचा केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 15:19 IST2021-01-06T15:18:22+5:302021-01-06T15:19:06+5:30

तू मला घटस्फोट दे अशी धमकी देऊन फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला.

Husband hacks wife's social media account; Allegations of immorality | पतीनेच केले पत्नीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक; अनैतिक संबंधाचा केला आरोप

पतीनेच केले पत्नीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक; अनैतिक संबंधाचा केला आरोप

पुणे : पतीनेच पत्नीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करुन स्वत: एका मुलासाेबत चॅटिंग करत असल्याचे म्हणत पत्नीला तुझे बाहेर संबंध असल्याचा आरोप करुन घटस्फोट दे अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अप्पर इंदिरानगर येथे हा प्रकार १२ मे २०१९ ते २७ एप्रिल २०२० दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी २३ वर्षाच्या विवाहितेने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पतीवर त्याच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना माहेरुन २ लाख रुपये घेऊन ये, असे बोलून मारहाण केली. पतीने फिर्यादीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक केले. स्वत: मुलासोबत चॅटिंग केले. त्यावरुन फिर्यादीला तुझे बाहेर संबंध आहेत. तू मला घटस्फोट दे अशी धमकी देऊन फिर्यादीचा मानसिक व शारीरीक छळ केला.

Web Title: Husband hacks wife's social media account; Allegations of immorality