शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधास कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह मित्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 09:07 IST

इंदापूर न्यायालयाने दोघा आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

इंदापूर : पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्रास अटक करण्यात आली आहे.  इंदापूर न्यायालयाने दोघा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जावेद जिलानी मुलाणी (वय ३२ वर्षे रा. बावडा, ता. इंदापूर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संदर्भात त्याचा भाऊ मुस्तफा जिलानी मुलाणी याने दिलेल्या फिर्यादीवरून जावेदची पत्नी व त्याचा मित्र प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत (रा. बावडा, ता. इंदापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जावेद मुलाणी मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. सन २०१७ मध्ये त्याचा विवाह झाला. त्याचा बालपणापासून मित्र असणारा प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत त्याच्या घरी नेहमी येत असे. दोघांमध्ये पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार चालत असत. नेहमीचे येणे व पैशांचे व्यवहार यातून जावेदची पत्नी व प्रवीण यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. त्यावरून फिर्यादीचे जावेद व त्याच्या पत्नीबरोबर भांडण होत असे. त्या भांडणामुळे व अनैतिक संबंधामुळे जावेद नेहमी तणावात राहू लागला. व्यसन करू लागला. या कारणावरून प्रवीण व जावेदची पत्नी जावेदला वेळोवेळी मारहाण करत होते. या संदर्भात फिर्यादीने प्रवीण व जावेदच्या पत्नीला समजावून सांगितले होते. मात्र काहीच बदल झाला नाही. जावेदला ते दोघे त्रास देतच राहिले.मागील दोन दिवसांपासून जावेद घरी न येता मुलाणी वस्ती जवळच्या ओढ्यावर अंघोळ करून तेथेच झोपत होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या घरी आला, त्यावेळी प्रवीणला घरात पाहून त्याने घरी का आलास अशी विचारणा केली. त्यावरून प्रवीणने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे ठार मारतो असे म्हणत तो जावेदच्या अंगावर चालून गेला. त्यामुळे भिऊन जावेद घरातून निघून गेला. फिर्यादीने प्रवीण यास जावेदला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला व घरातून निघून जाण्यास सांगितले. तो निघून ही गेला. त्या रात्री जावेद घराच्या ओट्यावर झोपला.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणने जावेदच्या घरी येऊन जावेदला दमदाटी केली व जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली,त्यामुळे जावेदने आत्महत्या केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार