पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी पतीस अटक

By Admin | Updated: August 25, 2015 04:34 IST2015-08-25T04:34:27+5:302015-08-25T04:34:27+5:30

माहेरच्या नातेवाइकांचा संसारात हस्तक्षेप होतो, या कारणावरून चाकण येथे पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली.

Husband arrested on wife's suicide | पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी पतीस अटक

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी पतीस अटक

चाकण : माहेरच्या नातेवाइकांचा संसारात हस्तक्षेप होतो, या कारणावरून चाकण येथे पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली.
उषा सचिन माळवे (वय २९, सध्या रा. सदगुरु अपार्टमेंट, शिक्रापूर रोड, चाकण, मूळ शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील देवराम भीमाजी सोनवणे (६४, सुखवास्तू जळवंडा, ता. जुन्नर) यांच्या फिर्यादीवरून उषाचा पती सचिन हारेश माळवे (३२, चाकण) याला अटक करण्यात आली आहे.
चाकण येथे उषा आपल्या ३ वर्षांचा मुलगा व पतीसह राहत होती. मात्र, उषाचे माहेरचे नातेवाईक वारंवार तिच्या संसारात हस्तक्षेप करीत होते. या कारणावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. सचिन उषाला नेहमीच शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून उषाने रविवारी (दि. २३) दुपारी तीनच्या सुमारास घरात कुणी नसताना छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सचिनला सोमवारी अटक केली आहे़
सचिनला त्वरित अटक होत नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह
ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे काही वेळ चाकण ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली उपनिरीक्षक महेश मुंडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Husband arrested on wife's suicide