शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

समुपदेशातून जुळून आल्या पुन्हा संसाराच्या रेशीमगाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 7:26 PM

पत्नीच्या मानसिक आजारपणाला कंटाळून दाखल केला होता घटस्फोटाचा दावा

ठळक मुद्देघटस्फोटाचा दावा घेतला मागे :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केली मध्यस्थी

पुणे : पत्नीच्या मानसिक आजारपणाला कंटाळून दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पतीने मागे घेतला. समुपदेशनाच्या माध्यमातून त्या जोडप्याच्या संसाराच्या रेशीमगाठी पुन्हा जुळून आल्या आहेत.  अर्जदार पतीने प्रमुख न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्याकडे घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. धोटे यांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्याकडे हा दावा मध्यस्थीसाठी पाठविला.   पती पत्नींच्या एकत्र आणि वेगवेगळ्या अशा सहा बैठका घेतल्या. दोघांमध्ये वैद्यकीय स्वरूपाची अडचण असल्याचे निदर्शनास आले. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी कोर्टाची पायरी चढले आहात, हे भागवत यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. पत्नीला समजावून सांगण्यात आले की, तिच्या पतीचे तिच्याबद्दलचे मत चांगले आहे. मात्र ती वैद्यकीय समस्येची बळी आहे. तिच्या आजाराला कंटाळून त्याने कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यांना दोन मुले आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचा १४ वर्षांचा मुलगा तिच्याकडे तर आठ वर्षांचा मुलगा त्याच्याकडे राहण्यास तयार होता. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या तुटलेल्या संसाराचा मुलांवर, त्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम होईल, हे त्यांना समजावून सांगण्यात आले. मुलांना दोघांची गरज आहे. त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्यापेक्षा तिच्या आजारपणात साथ द्यावी. मानसिक आजार बरा होतो, हे समजावून सांगितले. त्यामुळे तिच्यापासून वेगळे होण्यासाठी पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली. ........*  मानसिक आजाराला कंटाळून संसारातून फारकत घेण्याचे प्रकार होत आहेत. या प्रकरणात पतीला वेगळे होण्यापेक्षाही तिच्या आजारपणाची त्याला जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, हे पटवून दिले.  तिला समजावल्यानंतर तिने मध्यस्थीच्या बैठकीदरम्यान पतीवरील प्रेम व्यक्त केले.   मानसिक आजारांकडे इतर आजारांप्रमाणे पाहिले पाहिजे. कौटुंबिक स्वरूपाच्या वादांमध्ये लोकांनी थेट कोर्टात दावा दाखल करण्यापूर्वी विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘चला बोलू या’ या वादपूर्व समुपदेशन केंद्रात यावे.  ही सुविधा न्यायालयाकडून राबविण्यात येत असून कायदेशीर आणि मोफत आहे, असे भागवत यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेrelationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोटFamilyपरिवारCourtन्यायालय