शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:53 PM

1 / 5
Apple Let Loose Event 2024: अॅपलचा लेट्स लूज इव्हेंट(Apple Let Loose Event 2024) पार पडला. या कार्यक्रमात Apple ने iPhone 16 सीरीज लॉन्च करण्यापूर्वी आपले न्यू जनरेशन आयपॅड डिव्हाइस लॉन्च केले. यात iPad Pro आणि iPad Air चा समावेश आहे. ॲपलचा दावा आहे की, आयपॅड एअर परवडणाऱ्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
2 / 5
Apple ने लेट्स लूज इव्हेंटमध्ये मॅजिक कीबोर्ड आणि अॅपल मॅजिक पेन्सिलदेखील लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे, मॅजिक पेन्सिलसाठी आजपासून ऑर्डर स्विकारली जाईल, तर iPad Pro, iPad Air आणि Magic Keyboard ऑर्डर स्विकारण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
3 / 5
आयपॅड एअर लॉन्च-Apple ने दोन आकारात iPad Air लॉन्च केले आहे, ज्यामध्ये iPad Air 11 इंच स्क्रीन आणि 13 इंच स्क्रीनचा समावेश आहे. Apple ने iPad Air मध्ये M2 चिपसेट दिला आहे, जो आधीच्या iPad मध्ये आढळलेल्या M1 चिपसेटपेक्षा 3 पट वेगवान आहे. यासोबतच यात मॅजिक कीबोर्ड आणि अॅपल पेन्सिलचा सपोर्टदेखील आहे. iPad air – 11-इंच मॉडेल $599 (सुमारे 49,996 रुपये) मध्ये लॉन्च केला आहे, तर iPad air 13-इंच मॉडेल $799 (सुमारे 66,687 रुपये) रुपयांमध्ये लॉन्च केले आहे. याच्या भारतीय किमतीबद्दल लवकरच माहिती समोर येईल.
4 / 5
आयपॅड प्रो लॉन्च केले-Apple ने दोन स्क्रीन आकारात iPad Pro देखील लॉन्च केला आहे, ज्यामध्ये iPad Pro 13 इंच आणि 11 इंच स्क्रीनचा समावेश आहे. आयपॅड प्रो ब्लॅक आणि सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. iPad Pro मध्ये नवीन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये OLED तंत्रज्ञान मिळेल. iPad Pro मध्ये Apple ने M2 चिपसेट ऐवजी M4 चिपसेट दिला आहे. iPad Pro मध्ये Magic Keyboard Pro आणि Apple Magic Pencil चा सपोर्ट मिळेल. iPad Pro 11 इंच मॉडेलची किंमत $999 (सुमारे 83,380 रुपये), तर 13 इंच मॉडेलची किंमत $1299 (सुमारे 1,08,419 रुपये) आहे. याच्या भारतातील किमतविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
5 / 5
अॅपल मॅजिक पेन्सिल -अॅपलच्या मते मॅजिक पेन्सिल गेमचेंजर अॅक्सेसरी आहे. अॅपलने नवीन मॅजिक पेन्सिलमध्ये सेन्सर दिले आहेत, जे चित्र काढताना विविध सुविधा देतात. यासोबतच ॲपल पेन्सिलने रंगही भरता येतो. Apple ने मॅजिक पेन्सिल $129 (सुमारे 10765 रुपये) लॉन्च केली आहे. Apple ने मॅजिक कीबोर्ड देखील लॉन्च केला आहे, त्याच्या 11 इंच व्हेरिएंटची किंमत $ 299 (सुमारे 24951 रुपये) आहे, तर 13 इंच व्हेरिएंटची किंमत $ 349 (सुमारे 29124 रुपये) आहे.
टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय