घराचे छत कोसळून पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:10+5:302021-06-18T04:09:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खडकमाळ आळी येथील जुन्या घराचे छत व भिंत कोसळून त्यात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. ...

Husband and wife injured when roof collapses | घराचे छत कोसळून पती-पत्नी जखमी

घराचे छत कोसळून पती-पत्नी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खडकमाळ आळी येथील जुन्या घराचे छत व भिंत कोसळून त्यात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. सीमा किशोर रावडे (वय ४६) आणि किशोर बबनराव रावडे (वय ५२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच स्टेशन ऑफिसर प्रमोद सोनवणे, अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, जवान अतुल मोहिते, प्रदीप पवार, चंद्रकांत गावडे, दिगंबर बंदावडीकर, अजीम शेख, स्वप्नील टुले, परेश जाधव, चंद्रकांत मेणुसे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. दोघेही जुन्या भिंतीच्या विटांमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोघा पती-पत्नींना घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

Web Title: Husband and wife injured when roof collapses