शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘भाई’ म्हणण्यास नकार दिल्याने पती-पत्नीला टोळक्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘सोन्या म्हणायचे नाही, मी इथला भाई आहे, भाई म्हणून बोलायचे’ असे सांगूनही भाई म्हणण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘सोन्या म्हणायचे नाही, मी इथला भाई आहे, भाई म्हणून बोलायचे’ असे सांगूनही भाई म्हणण्यास नकार दिल्याने टोळक्याने पती-पत्नीला मारहाण केली. साडेसतरा नळी येथे १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली.

हडपसर पोलिसांनी सोन्या जगताप, जालिंदर खलसे, शुभम साखुरे, करण दहीवडे, शाहरुख, उंदऱ्या, सोन्या जगतापचे मित्र अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी आनंदा मारुती काळे (वय २५, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. काळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या बुलेटचा आवाज वाढवल्याने सोन्या जगताप याने त्यांना ‘ए आवाज कोणाला काढला रे’ असे विचारले. तेव्हा फिर्यादी यांनी ‘ए सोन्या तुला नाही केला’ असे म्हणाले. त्यावर आरोपींपैकी एकाने ‘त्याला सोन्या म्हणायचे नाही...तर भाई म्हणायचे,’ असे सांगितले. त्याला फिर्यादी यांनी ‘मी त्याला सोन्याच बोलणार, भाई तुझ्या घरी’ असे उत्तर दिले. त्यावर राग येऊन सोन्या जगताप व इतरांनी आनंदा काळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बेल्टने मारले. सोडविण्यासाठी गेलेल्या त्यांची पत्नी व मावस सासू यांनाही मारहाण केली.