पुण्यातील धक्कादायक प्रकार! बालविवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 21:45 IST2022-04-27T21:45:51+5:302022-04-27T21:45:59+5:30

अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस

Husband and daughter father charged with child marriage in pune | पुण्यातील धक्कादायक प्रकार! बालविवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बालविवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल

चाकण : कायद्याने बालविवाह लावणे आणि करून देणे हा गुन्हा असताना देखील अनेक ठिकाणी बालविवाह लावले जात आहेत. असाच प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीचा पती आणि मुलीच्या वडिलांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीच्या पतीवर आणि वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ जुलै २०२१ रोजी खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील आदिवासी ठाकरवस्ती येथे घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी १९ वर्षीय तरुणासोबत विवाह लावून दिला. त्यानंतर पतीने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला तीन महिन्यांची गरोदर केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, बाल विवाह कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Husband and daughter father charged with child marriage in pune