शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘निवार’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST

राज्यातही पाऊस \Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘निवार’ चक्रीवादळाचे रुंपातर मंगळवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात ...

राज्यातही पाऊस

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘निवार’ चक्रीवादळाचे रुंपातर मंगळवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात झाले असून ते बुधवारी सायंकाळी तामिळनाडुतील कराईकल आणि पाँडेचरीमधील ममल्लापूरम दरम्यान किनारपट्टीला धडकणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार असून २५ ते २७ नोव्हेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

बंगालच्या उपसागरातील ‘निवार’ चक्रीवादळ मंंगळवारी दुपारी चेन्नईपासून ४५० किमी आणि पाँडेचरीपासून ४१० किमी दूर होते़ हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वारे ताशी १०० ते ११० किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे़ याचा परिणाम गुरुवारी सकाळपर्यंत जाणवणार असून त्यानंतर ते शांत होईल़ आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडु, पाँडेचरी, तेलंगणा, दक्षिण कर्नाटकात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़

राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मध्य महाराष्ट्राच्या बहुताश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात २५ व २६ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते २७ नोव्हेंबर तसेच वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात २६ व २७ नोव्हेंबर रोजी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़ गोंदिया, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबांद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे.