कोरोना लसीकरण मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:26+5:302021-09-02T04:23:26+5:30

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पुणे जिल्हा परिषद व बजाज फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीमधून मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम ...

Huge response to corona vaccination campaign | कोरोना लसीकरण मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

कोरोना लसीकरण मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पुणे जिल्हा परिषद व बजाज फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीमधून मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्य़ात आली असून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील ३९ गावांसाठी सुमारे २१ हजार लसींचे डोस उपलब्ध झाल्याचे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी खंडाळे (ता. शिरूर) येथील लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर सांगितले. यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, उद्योजक विठ्ठल नळकांडे, गणेश लांडे, डॉ. राम देवखिळे, आरोग्यसेविका मीरा इंगळे, आशासेविका सुजाता नरवडे, चंद्रकला दरवडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तिरखुंडे, राजाराम चोरे उपस्थित होते.

३९ गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यासाठी ६५ लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशासेविका, स्थानिक शाळेचे शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक यांचा या लसीकरण पथकात समावेश होता.

३१ रांजणगाव गणपती

खंडाळे येथे महालसीकरण मोहिमेत लस देताना आरोग्यसेविका.

310821\img_20210831_144453.jpg

खंडाळे येथे लसीकरण करतांना आरोग्य कर्मचारी

Web Title: Huge response to corona vaccination campaign