शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 21:27 IST

बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे.

Baramati Election Result ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची चांगलीच चर्चा झाली. या मतदारसंघात तीन टर्मपासून खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. बारामती आणि आसपासच्या तालुक्यांवर वर्चस्व असणाऱ्या अजित पवार यांच्या या निर्णयामुळे बारामतीत राजकीय उलथापालथ होणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे. बारामतीच्या या लढतीत आणखी एका उमेदवाराची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्या उमेदवाराचं नाव होतं शरद राम पवार.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या शरद राम पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. "रिक्षावाल्यांच्या समस्या, वाहनचालकांना मिळणारे कमी दर, पुण्यातील वाहतूक कोंडी यासह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझं मूळ गाव धोंडराई, बीड जिल्ह्यात आहे. परंतु गेल्या १५ वर्षापासून मी आंबेगावात राहायला आहे. घराणेशाहीचे राजकारण सध्या इथे सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्हाला आश्वासन नको, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत," अशी भूमिका निवडणूक अर्ज भरताना शरद राम पवार यांनी मांडली होती. त्यामुळे बारामतीचा मतदार या उमेदवाराला कितपत प्रतिसाद देणार, याबाबत औत्सुक्य निर्माण झालं होतं. मात्र प्रत्यक्ष निकालात शरद राम पवार या उमेदवाराला अवघी ७३१ मतं पडली आहे. बारामतीत नेमकं काय घडलं?

सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.

दरम्यान, बारामतीवर थोरले की धाकटे पवार वर्चस्व राखणार याकडे दिल्लीपासून गल्लीचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान आहे. वेळोवेळी मिळालेल्या राजकीय यशाचे हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासह ‘साहेब’ आणि ‘दादां’च्या राजकारणाचेच एका अर्थाने आज भवितव्य ठरणार होते. मतदारसंघात यंदा ६९.४८ टक्के मतदान झाले. हेच मतदान २०१९ मध्ये ७०.२४ टक्के झाले होते. त्यामुळे यंदा बारामतीच्या मतदानात ०.७६ टक्के घट झाली. भावनिकतेचा मुद्दा आणि विकासकामांच्या मुद्यासह पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेले आरोप यंदाच्या लोकसभेत चर्चेचा विषय ठरले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल