शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

इन हाऊस कोट्यातील प्रवेशात गोंधळ?

By admin | Updated: July 3, 2016 04:14 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सध्या इन हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. मात्र, इन हाऊस कोट्यातील प्रवेश देताना काही शाळांकडून दुसऱ्याच

पुणे : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सध्या इन हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. मात्र, इन हाऊस कोट्यातील प्रवेश देताना काही शाळांकडून दुसऱ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांना इन हाऊस कोट्यातून प्रवेश दिला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून इन हाऊस कोट्यातील प्रवेशाची काटेकोर तपासणी केली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. इन हाऊस कोट्यातून विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेशी जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता, तसेच यंदा एकाच संस्थेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याच संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध होणाऱ्या इन हाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश घेता येतो. परंतु, शाळांकडून इन हाऊस कोट्याचे प्रवेश देताना नियम पाळले जात नसल्याचे काही पालक सांगत आहेत. इन हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरली जाते. त्यातही शाळांकडून भरण्यात आलेल्या माहितीवर अकरावी केंद्रीय नियंत्रण प्रवेश समितीकडून विश्वास ठेवला जातो. त्यामुळे इन हाऊस कोट्यातून प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले त्याच शाळेतील आहेत का? हे तपासण्याची आवश्यकता आहे. काही शाळांकडून इन हाऊस कोट्यातून प्रवेश देत असल्याचे सांगून दुसऱ्याच शाळेतील विद्यार्थ्याला आपल्याच शाळेतील विद्यार्थी असल्याचे दाखविले जाऊ शकते.आता प्रतीक्षा दुसऱ्या गुणवत्ता यादीची अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवता यादीतून तब्बल ३७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच सध्या विविध कोट्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. येत्या ४ जुलै रोजी कोट्यातील प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर ५ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. शाळांकडून राबविल्या जाणाऱ्या कोट्यांतर्गत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यांतरच दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.