शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Pune Crime: हप्ता पाहिजे म्हणून हॉटेल मालकाला कोयत्याने वार करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 6:49 PM

घटनेत परस्पर विरुध्द ४ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील डेहणे येथे हॉटेलेच्या काचा फोडून हप्ता पहिजे म्हणून हॉटेल मालकाला कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत परस्पर विरुध्द ४ जणांवर खेडपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.          याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहणे येथील हॉटेल मालक शंकर दत्तात्रय कोरडे रा. डेहणे ( ता.खेड ) यांनी फिर्यादित म्हटले आहे. की,हॉटेलमध्ये पत्नी व आचारी व भाऊ जगदिश सतुभाउ कोरडे असे हॉटेलमध्ये काम करत होते. कोरडे हे हॉटेललगत असणाऱ्या घरी होते. दरम्यान अचानक हॉटेलच्या काचा फुटण्याचा आवाज आल्याने ते पळत हॉटेलमध्ये आले. दरम्यान आकाश हुरसाळे व त्याचे सोबत इतर २ ते ३ मुले होती. त्यांच्या हातात कोयते होते. आकाश हुरसाळे याला फिर्यादीने विचारले आमच्या हॉटेलच्या काचा का फोडतो, मला तू हप्ता का देत नाही असे म्हणून चिडून आकाश हुरसाळे याने हातातील कोयत्याने तसेच त्याचे सोबत असलेल्या मुलाने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन जखमी केले. 

दुसऱ्या फिर्यादीत रोशन अरुण परड (वय १७ ) रा.मंदोशी (ता.खेड ) याने म्हटले आहे की, मी व मित्र मनिष आंबेकर, निकेतन जाधव, असे तिघेजण शंकर कोरडे यांचे हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलो होतो. आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा फीर्यादीच्या ओळखीचे समिर कोरडे, नामदेव कोरडे, शंकर कोरडे सर्व रा. डेहणे (ता.खेड ) हे हॉटेलमध्ये दारु पित बसले होते. ते आमच्याकडे पाहून शिवीगाळ करत होते. म्हणुन फिर्यादीने विचारले तुम्ही शिव्या कोणाला देता, दरम्यान बाचाबाची झाली. नामदेव कोरडे हा हॉटेलमधून बाहेर जाऊन पुन्हा हॉटेलमध्ये तीन कोयते घेऊन आला. नामदेव कोरडे यांनी त्याचे हातातील कोयते शंकर कोरडे, समिर कोरडे यांचेकडे एक एक दिला व ते आमचे जवळ येवुन आम्हास मारहाण करु लागले. मला नामदेव कोरडे यांनी फिर्यादीच्या पाठीत  कोयत्याने मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले. त्यावेळी सोबत असलेले फिर्यादीचे मित्र मनिष आंबेकर व निकेतन जाधव हे मारहाणीचे भितीने पळून गेले. नामदेव कोरड शंकर कोरडे व समिर कोरडे यांनी रोशन परड याला लाथाबुक्कयांनी मारहाण केली. पुढील तपास खेड पोलीस करत आहे.

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक