पुणे : नऱ्हेमध्ये गॅस गळती झाल्याने हॉटेलला आग; हॉटेलचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 16:20 IST2022-06-04T16:19:14+5:302022-06-04T16:20:34+5:30

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Hotel leaks due to gas leak in Narhe Major damage to the hotel | पुणे : नऱ्हेमध्ये गॅस गळती झाल्याने हॉटेलला आग; हॉटेलचे मोठे नुकसान

पुणे : नऱ्हेमध्ये गॅस गळती झाल्याने हॉटेलला आग; हॉटेलचे मोठे नुकसान

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील एका हॉटेलला आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचे नुकसान मोठ्या प्रमाणत झाले आहे. 

मिळालेली माहिती अशी की, नऱ्हे येथील झील कॉलेज चौकात हॉटेल सृष्टी चायनीज या नावाने हॉटेल आहे. आज शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये असणाऱ्या गॅस टाकीच्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्याने आग लागली. आग हळूहळू वाढत असल्याने या घटनेची माहिती एका नागरिकाने सनसिटी अग्निशमन दलाला फोन करून कळविली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हॉटेल मधील फर्निचर, भांडी, टेबल, सीलिंग फॅन आदी साहित्य जळून खाक झाले आहे.

Web Title: Hotel leaks due to gas leak in Narhe Major damage to the hotel