लाखणगाव हद्दीत घोडनदी पुलावर भीषण अपघात; ट्रकचे नुकसान, चालकाने मारली नदीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 17:56 IST2024-01-17T17:55:44+5:302024-01-17T17:56:12+5:30
वाहनचालकाचा पुलाशेजारील वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होउन अपघात

लाखणगाव हद्दीत घोडनदी पुलावर भीषण अपघात; ट्रकचे नुकसान, चालकाने मारली नदीत उडी
अवसरी : बेल्हा जेजुरीमहामार्गावर घोडनदी पुलावर लाखणगाव गावच्या हद्दीत मंगळवार दिनांक १६ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाहनचालकाचा पुलाशेजारील वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होउन अपघात झाला आहे. यावेळी वाहनचालकाने घोडनदीत उडी मारल्याने तो बचावला आहे.
याबाबत सविस्तर असे की, हा ट्रक एम एच १२ क्यू डब्लू ८६४४ उरुळी कांचन वरून नाशिक कडे स्क्रेप ( पुठ्ठा ) घेऊन जात दिनांक १६ रोजी रात्री ९:३० चे दरम्यान हा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील काही स्क्रेप घोडनदीत पडले होते. लाखणगाव येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदत कार्यात सहभाग घेतला, बबन बरकले यांनी क्रेन व जेसिबी यांना संपर्क केला. काही काळ बेल्हा जेजुरीमहामार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूने गाड्यांची गर्दी झाली होती. पारगाव का. पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार संजय साळवे यांना माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पारगाव पोलीस स्टेशनशी संपर्क केला. पारगाव का. पोलीस घोडके आणी कर्मचारी यांनी रोडेवाडी फाटा मार्गे वाहतूक वळवण्यात आली. महामार्गवरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाने अपघात झालेल्या ट्रक मालकाचा मोबाईल नंबर दिल्याने शिवमल्हार ट्रान्सपोर्ट ट्रक मालक यांना सपंर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले. पुढील तपास पारगाव का. पोलीस करत आहेत.