वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:59 IST2025-05-03T12:59:31+5:302025-05-03T12:59:52+5:30
अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली.

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
किरण शिंदे
पुणे: आज पहाटे सुमारे ४:३० वाजता बेंगळुरू- पुणे महामार्गावर वडगाव पुलाजवळ भीषण अपघात घडला. विशाल हॉटेलजवळ मर्सिडीज कारने स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून मागे बसलेल्या प्रवाशास गंभीर दुखापत झाली आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे कारमधील चालक आणि इतर प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १०५ BNS (गैरकृत्यात्मक मानवहत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर दोन आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.