हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 10:36 IST2025-03-26T10:35:53+5:302025-03-26T10:36:12+5:30

सुनील कांबळे यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

Hookah parlor licenses will be cancelled permanently: Devendra Fadnavis | हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार : देवेंद्र फडणवीस

हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार : देवेंद्र फडणवीस

पुणे : कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे शहरात अनेक ठिकाणी विशेषतः महाविद्यालय परिसरात हुक्का पार्लर हॉटेलमध्ये बेकायदेशीर चालवली जातात. त्या ठिकाणी हुक्काच्या नावाखाली ड्रग्ज, गांजा तसेच अमली पदार्थ मुलांना दिले जातात. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी ही प्रकार सुरू असून, अशा हुक्का पार्लरला कोरेगाव पार्क तसेच परिसरात परवानगी दिली आहे का? असा प्रश्न कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. 

पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये ?

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हुक्का पार्लरचे प्रस्थ रोखण्यासाठी २०१८ मध्ये कायदा करण्यात आला. आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास ३ वर्षे शिक्षा आहे. मात्र, आता कायद्यात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांदा हुक्का सापडल्यास ६ महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे आणि तिसऱ्यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करणे आणि संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Web Title: Hookah parlor licenses will be cancelled permanently: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.