शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान : पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 1:51 AM

उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

पुणे  - उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांत उल्लेखनीय सेवेबद्दल पुणे पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांचा समावेश आहे़ गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड, मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहिते, विठ्ठल कुबडे (पिंपरी), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे (गुन्हे शाखा), किशोर अत्रे (बिनतारी संदेश विभाग), सहायक फौजदार चंद्रकांत इंगळे (गुन्हे शाखा) तसेच दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे समादेशक श्रीकांत पाठक यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे़कारागृह विभागातील सुभेदार कलप्पा कुंभार (येरवडा कारागृह), हवालदार कैलास बाऊस्कर(मुंबई जिल्हा महिला कारागृह), शिपाई संजय तलवारे, राजू हाते (नागपूर कारागृह) यांना राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर करण्यात आले आहे़नागपूरहून पुणे पोलीस आयुक्तालयात सहआयुक्तपदी नुकतेच रुजू झालेले शिवाजी तुळशीराम बोडखे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे़ बोडखे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सुद्रीक या गावचे असून १९८४मध्ये पोलीस उपअधीक्षकपदावर नियुक्त झाले़ चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना सेवाकालावधीत उत्कृष्ट सेवेबद्दल ६१६ बक्षिसे मिळालेली असून त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व मिळाले आहे़पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे पोलीस अधीक्षक व नियंत्रक सारंग दादाराम आवाड यांनी १९९६मध्ये सेवेची सुरुवात केली. पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षक असताना विक्रमी ३७३ गुन्ह्यांमध्ये सापळा रचून कारवाई केली. पुण्यात वाहतूक पोलीस उपायुक्तपदी असताना मोटार वाहन कायद्याअंतर्गत विक्रमी कारवाई केली. राज्य राखीव पोलीस बलात क्र. २ येथे कमांडंट असताना त्यांनी गट २ ला प्रथम आयएसओ मानांकन मिळवून दिले.पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे हे १९९३मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले़ त्यांना आतापर्यंत ८६९ रिवॉर्ड आणि विशेष सेवापदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, आंतरिक सुरक्षा पदक प्राप्त झाली आहेत.मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहिते १९९३मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले़ त्यांना आतापर्यंत ३५८ बक्षिसे मिळालेली असून पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रकही मिळाले आहे़पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे हे पोलीस शिपाई म्हणून १९८३मध्ये पोलीस सेवेत भरती झाले़ त्यांना २०० बक्षिसे मिळाली आहेत़गुन्हे शाखेचे सहायक फौजदार चंद्रकांत इंगळे यांना आतापर्यंत ३५६ बक्षिसे मिळालेली असून पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक मिळाले आहे़दौैंड येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे समादेशकश्रीकांत पाठक यांना राष्ट्रपतीपोलीस पदक जाहीर झाले आहे. पाठक हे २२ वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सायकलिंग व्यायामाचे महत्त्व ते पटवून देत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी दौंड ते पंढरपूर हा १४८ किलोमीटरचा सायकल प्रवास सात तासांत पार केला होता़

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे