शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या कर्तृत्वाला पोलीस महासंचालकांचा सन्मान

By admin | Updated: April 11, 2015 22:54 IST

लहानपणापासून उराशी बाळगलेलं नेमबाजीचं स्वप्न पोलीस दलामध्ये भरती झाल्यावरही तिने त्याच जिद्दीने जपलं. पोलीस दलातील धावपळीची नोकरी आणि संसार सांभाळून तिने स्वत:ला ‘चॅम्पियन’ बनवलं.

पुणे : लहानपणापासून उराशी बाळगलेलं नेमबाजीचं स्वप्न पोलीस दलामध्ये भरती झाल्यावरही तिने त्याच जिद्दीने जपलं. पोलीस दलातील धावपळीची नोकरी आणि संसार सांभाळून तिने स्वत:ला ‘चॅम्पियन’ बनवलं. सुरुवातीला आई-वडील आणि नंतर पतीच्या पाठिंब्यावर विविध स्पर्धांमध्ये स्वत:ची छाप उमटवणाऱ्या पोलीस नाईक परवीन मेहबूब पठाण यांच्या खेळातील कर्तृत्वाची दखल पोलीस खात्यानेही घेतली. खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. परवीन पठाण सध्या पिंपरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. पठाण या मूळच्या बारामतीजवळील नीरावागज या गावच्या. वडील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात नोकरीला, तर आई गृहिणी. त्यांना चार मुली आणि एक मुलगा. आई-वडिलांनी सर्व अपत्यांना शिकवले. परवीन यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. त्यांची आणखी एक बहीण पोलीस दलातच असून सध्या मुंबईमध्ये नेमणुकीस आहे. तर चौथी बहीण आणि भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या परवीन २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाल्या. त्यांना लहानपणापासूनच नेमबाजीची आवड होती. त्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. एनसीसीमध्ये असताना तर ही आवड आणखीच वाढली. दरम्यान, २०११ मध्ये त्यांचे आसिफ इकबाल शेख यांच्यासोबत लग्न जमले. २०११ मध्ये हरियानातील कादरपूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना जायचे होते. साखरपुडा नुकताच उरकलेला असताना त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या. तेथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी कास्यपदक पटकावले होते. त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून स्वत:चा ठसा उमटवला. पती आसिफ शेख यांनीही त्यांची खेळातील रुची पाहून कायमच पाठींबा दिला. दरम्यान, त्यांना मुलगी झाली. तिचे नाव झोया. संसाराची जबाबदारी सांभाळून परवीन २०१४ मध्येही पुन्हा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या. या स्पर्धा स्त्री-पुरुष एकत्रित होत्या. त्यातही त्यांनी जिद्दीने भाग घेत देशात चौथे आणि राज्यात पहिले स्थान पटकावले. ४भोपाळ, इंदोर, हरियाना, जालंधर, बालेवाडी आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये पुणे शहर पोलीस दलाला परवीन यांनी आतापर्यंत तब्बल अकरा पदके प्राप्त करुन दिली आहेत. यामध्ये चार सुवर्ण, चार रौप्य, तीन कास्य पदकांचा समावेश आहे. पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. या यशाचे श्रेय आई-वडिलांना देत असल्याचे परवीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महासंचालकपदकामुळे पोलीस दलाने सन्मान केल्याची भावना असून यापुढे खेळामध्ये अधिक जोमाने पुढे जाण्यासाठी त्यामुळे प्रेरणा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.