शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

सुटी घरी बसण्यासाठी दिली, बँकेतील कामे करण्यासाठी नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:00 PM

शहरातील विविध बँकांमध्ये काही दिवसांपासून नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे..

ठळक मुद्देग्राहकांनो बँकेत गर्दी करु नका : परिस्थितीचे गांभीर्य ओळखावेबँकेतील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या गर्दीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होईल, ही भीती

पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सांगितले आहे. याशिवाय, काही आयटी कंपन्या, खासगी विमा कंपन्यांमधील बहुतांश घरी बसून काम करीत आहेत. वास्तविक, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्यात येत असली, तरीदेखील नागरिक सुटीच्या निमित्ताने बँकांमध्ये गर्दी करत आहेत.  शहरातील विविध बँकांमध्ये काही दिवसांपासून नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. सध्या अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद ठेवल्या आहेत. यापुढे बँक सेवादेखील बंद होईल, या भीतीने नागरिक बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. तर, दुसरीकडे बँकेतील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या गर्दीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहवयास मिळाली. नागरिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने बँकेत येण्याऐवजी ऑनलाईनद्वारे बँकिंग करावे, असे बँक  प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ‘बँकेत जास्त वेळ थांबू नका’ म्हटल्यावर नागरिकांना बँक प्रशासन अरेरावी करत असल्याचे वाटते, अशी प्रतिक्रिया खासगी बँकेतील व्यक्तीने दिली.आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून त्यात नागरिकांनी बँकेत गर्दी करण्यापेक्षा आपली कामे ऑनलाईनच्या माध्यमातून करावीत, असे सांगितले आहे. असे असतानादेखील नागरिकांची बँकेतील उपस्थिती चिंतेचा विषय ठरत आहे. सक्ती नव्हे, तर स्वयंशिस्तीने सूचना पाळण्याची गरज असल्याचे आवाहन बँक प्रशासन सातत्याने करत आहे. शासनाकडून अद्याप बँकिंग क्षेत्राला ‘वर्क फ्रॉम होम’च्या कुठलेही आदेश अथवा सूचना दिलेल्या नाहीत. प्रत्येक बँकेचे सॉफ्टवेअर वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने घरून बँकिंगचे काम अवघड असल्याचेही बँकेतील अधिकाऱ्याने सांगितले. 

*चौकट मुळात ज्या कारणाकरिता लोकांना सुटी अथवा ‘वर्क फ्रॉम होम’ सांगितले आहे, त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. आपल्या बेशिस्तपणाचा फटका सर्वांना बसू शकतो, याचा विचार त्यांनी करावा. आता सर्वांकडे आॅनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, गुगल पे यासारख्या सुविधा उपलब्ध असतानादेखील विनाकारण त्यांनी बँकेत येण्याचा अट्टहास करू नये. सर्वांनी सहकार्य केल्यास कोरोनाच्या संकटातून बाहेर पडता येईल; अन्यथा त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील, याचा विचार नागरिकांनी जरूर करावा. - मंगला राव (बँकर) ०००

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbankबँकEmployeeकर्मचारी