बहिणीच्या घरी सोडतो म्हणून चारचाकीत घेऊन उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 19:18 IST2022-12-01T19:17:40+5:302022-12-01T19:18:33+5:30

पीडित तरुणीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

highly educated young woman was raped by a four-wheeler for dropping her off at her sister's house | बहिणीच्या घरी सोडतो म्हणून चारचाकीत घेऊन उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

बहिणीच्या घरी सोडतो म्हणून चारचाकीत घेऊन उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

राजगुरूनगर (पुणे) : बहिणीच्या घरी चारचाकीतून सोडतो म्हणून तरुणीवर चारचाकीत बलात्कार केल्याची घटना दि. ३० रोजी घडली आहे. याबाबत खेड पोलिसांनी विकास ज्ञानेश्वर गुरव (वय ३४ रा खंडोबावस्ती कडधे ता. खेड ) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पीडित तरुणीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी उच्च शिक्षण घेत आहे. पिडित तरुणीला बहिणीकडे स्विफ्ट गाडीतून सोडतो म्हणून विकास गुरुव तरुणीला घरापासून घेऊन गेला. स्विफ्ट गाडी बहिरवाडीच्या कॉर्नरला जवळील कच्च्या रस्त्याला गाडी थांबवून गाडीमध्ये तरुणीचे दोन्ही हात पकडून गाडीतील मागील सिटवर जबरदस्तीने झोपवून बलात्कार केला. या घटनेबाबत घरी कोणालाही काही सांगू नको असे पीडित तरूणीला सांगितले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा राणी घाटे करीत आहे.

Web Title: highly educated young woman was raped by a four-wheeler for dropping her off at her sister's house