रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:18 IST2026-03-05T16:17:56+5:302026-03-05T16:18:16+5:30

तक्रारदारासह १६ जणांकडून आरोपींनी ३५ लाख ५३ हजार रुपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलाला नोकरी लावली नाही

High-ranking officials in the railways identified; Child lured with job, cheated of Rs 35 lakhs | रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक

रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक

पुणे: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने १६ जणांची ३५ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींशी तक्रारदाराची ओळख झाली होती. आरोपींचे धनकवडीतील एका इमारतीत कार्यालय आहे. रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख असल्याची बतावणी आरोपींनी केली. तक्रारदाराच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. तक्रारदारासह १६ जणांकडून आरोपींनी ३५ लाख ५३ हजार रुपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलाला नोकरी लावली नाही. तक्रारदाराने विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनाली कथले करीत आहेत.

Web Title : रेलवे नौकरी घोटाला: उच्च पदस्थ अधिकारियों का प्रतिरूपण, ₹35 लाख की धोखाधड़ी

Web Summary : पुणे में रेलवे की नौकरी का वादा करके सोलह लोगों से ₹35 लाख की धोखाधड़ी की गई। उच्च पदस्थ अधिकारियों का प्रतिरूपण करते हुए, आरोपियों ने पैसे लिए लेकिन नौकरी देने में विफल रहे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Railway Job Scam: High-Ranking Officials Impersonated, ₹3.5 Million Fraud

Web Summary : Sixteen people were defrauded of ₹3.5 million in Pune with the promise of railway jobs. Impersonating high-ranking officials, the accused took money but failed to deliver jobs. Police have registered a case and are investigating.