राज्य उत्पादन शुल्क विभागाला उच्च न्यायालयाचा दणका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:21 IST2026-01-10T12:19:59+5:302026-01-10T12:21:19+5:30
पुणे : शहरातील नामांकित ‘टू बीएचके डायनर अँड की क्लब’चा मद्यपरवाना निलंबित करण्याचा पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेला ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाला उच्च न्यायालयाचा दणका !
पुणे : शहरातील नामांकित ‘टू बीएचके डायनर अँड की क्लब’चा मद्यपरवाना निलंबित करण्याचा पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. तत्काळ सील हटवून व्यवसाय सुरू करण्याची परवानगीदेखील क्लबला देण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षी (दि. १५ ऑगस्ट) शहरातील एकूण आठ पबवर नियम आणि वेळेनंतर पब सुरू ठेवून तसेच मद्यविक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईनंतर अनियमिततेचा ठपका ठेवत दोन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने टू बीएचके डायनर अँड की क्लबवर कारवाई करत त्यांचा १५ दिवसांसाठी परवाना रद्द करून पबला सील ठोकले होते. दरम्यान या कारवाईविरोधात क्लबचे प्रमुख डॉ. हेरंब शेलके यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयात त्यांच्या वतीने ॲॅड. प्रल्हाद परांजपे यांनी जोरदार युक्तिवाद केला. उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ही एकतर्फी, अविचारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने याची दखल घेत, १५ दिवसांसाठी लावण्यात आलेला मद्यपरवाना निलंबनाचा आदेश स्थगित केला.
या आदेशामुळे टू बीएचके डायनर अँड की क्लब पुन्हा एकदा तात्काळ सुरू होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणतीही यंत्रणा कायद्यापेक्षा मोठी नाही हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला आहे.