शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही ‘हाय अ‍ॅलर्ट’

By admin | Updated: July 28, 2015 04:35 IST

पंजाबमधील गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुण्यालाही हाय अ‍ॅलर्ट देण्यात आला असून, पुणे पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.

पुणे : पंजाबमधील गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुण्यालाही हाय अ‍ॅलर्ट देण्यात आला असून, पुणे पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. यासोबतच सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागामध्ये गस्त वाढवण्याच्या, नाकाबंदी लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. पुणे शहराला दहशतवादी हल्ल्यांच्या दृष्टीने कायमस्वरूपी अ‍ॅलर्ट आहे. पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये, १ आॅगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर तसेच १० जुलै २०१४ रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. यासोबतच कोरेगाव पार्क भागातील ज्यू धर्मीयांचे धार्मिक स्थळ असलेल्या छाबड हाऊस, ओशो आश्रम, दगडूशेठ गणपती मंदिरालाही कायमस्वरूपी ‘रेड अ‍ॅलर्ट’ आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमच सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असतो. पोलिसांनी शहरातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील अशा ५२ ठिकाणांची यादी केलेली असून, तेथील सुरक्षेची वारंवार तपासणी करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्याच्या, नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकांना शहरातील सर्व बस स्थानके, रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बीडीडीएसने स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, चिंचवडसह काही ठिकाणी तपासणीला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पुण्याला कोणताही अ‍ॅलर्ट दिल्याचे यंत्रणांनी कळवले नसले, तरी सावधगिरी म्हणून शहर पोलिसांनी आवश्यक पावले उचलली असल्याचेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)दहशतवादी हल्ला पोलीस ठाणी, शासकीय कार्यालये तसेच मॉल यांसह कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनीही जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. पुण्यामधील बॉम्बस्फोटांतील आरोपी तसेच एटीएसने नुकतेच पकडलेले नक्षलवादी खोल्या भाड्याने घेऊन राहिलेले होते. या कोणत्याही घटनेत भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भाडेकरू ठेवताना पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. एटीएसच्या पुणे विभागाने अंतर्गत ‘इनपुट’ तपासायला सुरुवात केली आहे. पंजाबमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबऱ्यांना सावध करण्यात आले असून, खबरदारी घेण्यात येत आहे.- भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त, एटीएस, पुणे