शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

अहो आश्चर्यम् ! जेव्हा सुमारे दोन हजार फुटांचे घर उभे राहते... तेही पायाविना... !   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:07 PM

अशा प्रकारे घर उंच करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात तरी पहिल्यांदाच होत असल्याचे बोलले जात आहे... नेमके काय प्रकरण आहे ते जाणून तरी घेऊ या..

ठळक मुद्देहरियाणा येथील एका टीममार्फत करण्यात आला प्रयोग

श्रीकिशन काळे 

पुणे : कोणतीही इमारत बांधण्याचा विचार झाला की सर्वात प्रथम विचार होतो तो पायाचा... पाया शिवाय उभी राहिलेली इमारती  फक्त वेरुळच्या लेण्यामधील कैैलास मंदिराचा.. परंतु, मानव जातीला एक वरदान मिळाले आहे ते म्हणजे  कल्पना शक्तीचे त्याच्या जोरावर तो नाही नाही ते अचाट प्रयोग करुन पाहतो.. असाच एक भन्नाट प्रयोग पुण्यातील घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्ता येथे करण्यात आला  आहे . तिथे चक्क सुमारे दोन हजार फुटांचे घर वर उचलून त्याची उंची वाढविण्याची किमया साधण्यात आली आहे. त्यासाठी हे घर जमिनीपासून कापून वर घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरामध्ये त्याबाबत चर्चा सुरू आहे. आपली कार पंक्चर झाली तर आपण ती वर उचलण्यासाठी त्याला जॅक लावतो. तशाच पध्दतीने घर खालून कापण्यात आले आणि त्याच्या खाली शेकडो जॅक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या घराची उंची वाढली आहे. अनेक वर्षांपूर्वी हे घर बांधण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या आजुबाजूला अनेक विकासकामे झाली. रस्ते बांधले गेले. त्यामुळे आजुबाजूची घरे आणि रस्ते उंच झाली. परंतु, हे घर जुने असल्यामुळे ते खालीच राहिले. त्यामुळे ते ठेंगणे दिसू लागले. रस्ता उंच आणि हे घर खाली झाल्याने रस्त्यावरील पाणीही या घरात येऊ लागले. आपलं घर खाली आणि रस्ता उंच हे त्या घरमालकाला रूचले नाही. त्यामुळे त्यांनी घरच उचलून त्याची उंची वाढविण्याचा चंग बांधला.सुमारे २००० स्क्वेअर फुटांच्या घराचा पाया कापून शेकडो जॅक लावून तो उचलला आहे. आणि घराच्या खालील जागेत नव्याने विटा रचण्यात आल्या आहेत. हरियाणा येथील एका टीमने हे सगळे काम केले आहे. अशा प्रकारे घर उंच करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात तरी पहिल्यांदाच होत असल्याचे बोलले जात आहे , अशी माहिती विजय अडागळे यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेHomeघर