शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

हेरिटेज विकण्याचा घाट

By admin | Updated: March 28, 2015 01:01 IST

फर्ग्युसन रस्त्यावरील आर्यभूषण प्रेसची हेरिटेज वास्तु खासगीकरणाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न संचालक मंडळाकडून सुरू आहेत.

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील आर्यभूषण प्रेसची हेरिटेज वास्तु खासगीकरणाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न संचालक मंडळाकडून सुरू आहेत. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नसल्याने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अ‍ॅड. सुनील गोखले यांनी दिली. महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रयत्नातून आर्यभूषणची स्थापना झाली होती. गांधी यांचे ‘हरिजन’ हे मुखपत्र आणि गोखले यांचे ‘ज्ञानप्रकाश’ हे दैनिक या प्रेसमधून प्रकाशित होत असे. मात्र, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सर्व्हंटस् आॅफ इंडिया सोसायटीकडून सहकार तत्त्वावर आर्यभूषण प्रेस सहकारी मुद्रणालयाकडे चालविण्यासाठी देण्यात आले होते. सद्य:स्थितीत हेरिटेज वास्तु (ग्रेड २) मध्ये त्याचा समावेश आहे. मात्र, संचालक मंडळाने राज्य मंत्रिमंडळाची मान्यता न घेता परस्पर खासगी व्यावसायिकांशी करार केला आहे. त्यामुळे जागेसह प्रेसवर खासगी व्यावसायिक दावा करीत आहे, असे वकिलांकडून सांगण्यात आले. हेरिटेज वास्तुमध्ये बांधकाम होऊन त्याचे विद्रुपीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय पुण्यातील काही बिल्डरांनी ही जागा विकसित करण्यासाठी पाहणी केली असून, त्याठिकाणी मॉल उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खासगीकरणाचा करार रद्द करावा; अन्यथा हेरिटेज वास्तु बिल्डरांच्या घशात जाऊ शकते. सहकारमंत्री पाटील यांना पत्र पाठवून आठ दिवस झाले. त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागवी लागणार आहे, असे अ‍ॅड. गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.