शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्ती बंधनकारक करावी

By admin | Updated: May 29, 2014 04:56 IST

हेल्मेट न घातल्याने अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वारांना प्राणास मुकाव्या लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निष्पन्न

शेलपिंपळगाव : हेल्मेट न घातल्याने अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वारांना प्राणास मुकाव्या लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निष्पन्न झाल्याने हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याबाबतचा महत्त्वाकांक्षी निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. मात्र, ही सक्ती फक्त पुणे शहरासाठी न करता चाकण-शिक्रापूर हायवेसारख्या जलदगती हायवे मार्गावर बंधनकारक करावी, अशी मागणी अखिल भारतीय माहिती सेवा समितीने वाहतूक विभागाकडे केली आहे. हेल्मेटसक्तीमुळे या रस्त्यावरील अपघातात बळी जाणार्‍यांची संख्या काहीशा प्रमाणात कमी करण्यास निश्चित मदत होणार आहे. चाकण - शिक्रापूर हायवे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने फार महत्वाचा असल्याने मोठी वाहने रस्त्यावरून प्रवास करत असतात. अलीकडच्या काही दिवसात इतर वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास न करता स्वता:च्या दुचाकीचा वापर करून प्रवास करण्याला बहुतांशी प्रवाशी पसंती देत असल्याने रस्त्यावर दुचाकी चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन्हीही पोलीस ठाण्यांकडून चौकांमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी हवालदार तैनात केलेले असतात. ारंतु हे हवालदार आपला बराचसा वेळ हॉटेलमध्ये चहा-कोफी व गप्पा मारण्यात घालवत असतात. परंतु, या महाशयांकडून दुचाकी प्रवासादरम्यान रस्ते परिवहन खात्याच्या सर्वच नियमांना धाब्यावर बसविले जाते. रस्त्यावर असलेल्या समस्या व मोठ-मोठ्या वाहनांनच्या सततच्या वदर्ळीने नित्याने अपघात होत असतात. यामध्ये दुचाकी चालकांना आपला जीव गमवावा लागतो. आजपर्यंत हजारो दुचाकी चालकांचा इतर वाहतुकीतील अपघातांमध्ये जीव गेल्याची सत्यस्थिती आहे. रस्त्यावरून प्रवास करताना स्वत:च्या सुरक्षतेसाठी डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करणे दुचाकी स्वारांसाठी तात्काळ सक्तीचे करावे अशी मागणी रस्ते परिवहन खात्याकडे अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, उपजिल्हाध्यक्ष मंगेश पºहाड, चाकण शहराध्यक्ष अभिजित जाधव, काळूस जिल्हा परिषद गणाचे अध्यक्ष माऊली डुंबरे, शेलपिंपळगावचे माजी उपसरपंच शरद मोहिते, अतुल कुटे, सयाजी मोहिते, पिंपळे-जगतापचे सरपंच सुनील बेंडभर, समितीचे जिल्हा सचिव पंकज हरगुडे, आयडियल फौंडेशनचे अध्यक्ष अविनाशजी मोहिते आदींनी केली आहे. (वार्ताहर)