पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी ; रस्ते झाले जलमय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:49 IST2019-10-04T16:48:19+5:302019-10-04T16:49:17+5:30
Pune Rain Latest Update : पुणे शहरामध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली असून अनेक भागांमधील रस्ते जलमय झाले आहेत.

पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी ; रस्ते झाले जलमय
पुणे : सप्टेंबरच्या अखेरीला पावसाने पुण्यात हजेरी लावून हाहाकार उडवून दिला हाेता. 25 सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावासात पुण्यात वीसहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. आज दुपारी चारच्या सुमारास पुन्हा एकदा मुसळधार पावासने शहरात हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांमध्ये शहरातील रस्ते जलमय झाले हाेते. त्यामुळे पुन्हा एकदा 25 सप्टेंबर सारखा प्रलय येताेय का अशी भीती पुणेकरांमध्ये निर्माण झाली हाेती.
आज दुपारी शहरात ढग भरुन आले. विजांच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटाच्या पावसात शहरातील रस्ते जलमय झाले. काेथरुड, डेक्कन, बिबवेवाडी, पुणे स्टेशन, कात्रज, सहकारनगर या भागांमध्ये जाेरदार पावसाच्या सरी काेसळल्या. पावसाचा जाेर इतका हाेता की समाेरचे दिसने अवघड झाले हाेते. अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जॅम सुद्धा झालेली पाहायला मिळाली.
तासभर काेसळल्यानंतर पाऊस काहीसा कमी झाला. छत्री, रेनकाेट साेबत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.