शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाने मुठा ओसंडून वाहू लागली, भिडे पूल पाण्याखाली, खडकवासल्यातून विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:01 IST

दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने धरणं लवकरच भरतील अशी आशा आहे

पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी सुरूच असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरात पाणी साचल्याचे आढळून आले आहे. काही भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे. अनावश्यक प्रवास व नदीकाठी फिरणे टाळावे. कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

भिडे पूल पाण्याखाली 

दरवर्षीं जूननंतर पाण्याखाली जाणारा भिडे पूल यंदा लवकरच पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसाने खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. खबरदारी म्हणून महापलिकेने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे मुठा नदी ओसंडून वाहू लागली आहे. आता भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे दिसून आले आहे. सध्या भिडे पुलावरून वाहतूक बंद असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे दिसून येत आहे.   

यंदा धरणं लवकर भरणार

खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या परिरसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे धरणं लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Puneपुणेriverनदीmula muthaमुळा मुठाWaterपाणीweatherहवामान अंदाजRainपाऊसDamधरण