शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:03 IST

मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या आहेत

पुणे: मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मंगळवारी मुंबईहून सुटणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगतीसह पाच ते सहा प्रमुख रेल्वे गाड्या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.  डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या पुण्याकडे न आल्यामुळे बुधवारी या गाड्या रद्द करण्यात आला आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई परिसर आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुपारनंतर लोकल व एक्स्प्रेस रेल्वे सेवा रद्द केली. मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मुंबई- पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. शिवाय, रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या पुण्यात शॉर्ट टर्मिनेट केल्या. यामध्ये कोयना आणि उद्यान या दोन गाड्यांचा समावेश होता. काही गाड्या पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या. बुधवारी सकाळी नियोजित वेळी उद्यान आणि कोयना पुण्यातून पुढे धावणार आहेत.

डेक्कन, प्रगतीचा मुंबईत थांबा 

मंगळवारी सकाळी डेक्कन क्वीन, प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटीकडे नियोजित वेळी निघाल्या. परंतु मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे निश्चित स्थळी पोहोचण्यास उशीर झाला. तसेच संध्याकाळी पुण्याला येणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी सकाळी या गाड्या पुण्यातून रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणे-मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

एसटी बस दोन तास उशिराने 

पुणे व परिसरात सुरू असलेल्या पावसाचा फटका एसटीच्या वेळापत्रकावर झाला. दरम्यान पुणे-मुंबई, पुणे - छत्रपती संभाजीनगर, पुणे - सोलापूर आणि पुणे - कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या ई-शिवनेरी बस दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बसस्थानकामध्ये ताटकळत थांबावे लागले. पुण्यातून नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या मार्गांवर धावणाऱ्या इतर बसगाड्यांनादेखील वाहतूककोंडी आणि पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. एसटीला उशीर झाल्याने प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी खासगी गाड्यांचा आधार घेतला. परंतु जास्तीचे तिकीट दर आकारण्यात आले. शिवाय, पावसामुळे रस्त्यात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली होती. तर, काही ठिकाणी वाहतूककोंडीमुळे या बसला उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीRainपाऊसWaterपाणीSocialसामाजिक