नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

By अजित घस्ते | Published: October 13, 2023 06:40 PM2023-10-13T18:40:01+5:302023-10-13T18:40:14+5:30

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळाला असल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत

Heavy arrival of yam at market yard during Navratri Festival This year the price is 20 to 30 rupees per kilo while the income is doubled | नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

पुणे: शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये मार्केट यार्ड बाजारात रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी वाढली आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस महिला विशेष उपवास करतात. या दिवसात ग्रामीण भागासह शहरात रताळे यांना अधिक मागणी असते. यामुळे सद्या मार्केटयार्ड बाजारात रोज ७० ते ८० टन रताळ्याची आवक होत आहे. शुक्रवारी बाजारात 70 टन मलकापूर, कराड, कोल्हापूर, कराड भागातून मोठ्या प्रमाणात आवक झाली.  मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळाला असल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहेत.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात दुप्पट आवक झाली. घाऊक बाजारातील गेल्या वर्षीच्या किलोला ३० ते ३५ रुपये किलो भाव मिळाला होता. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रताळ्याला २० ते २५ रुपये किलो भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात यावर्षी रताळे ३० ते ४० किलो भावाने विक्री केली जात आहे. आवक मार्केट यार्ड येथे सोलापूर, करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगावसह, कराड, कोल्हापूर गावातून होत आहे. तर कर्नाटक बेळगांव भागातून आवक झाली.

सद्या रताळ शेती करणे परवडत नाही

अर्धा एकर मध्ये रताळ उत्पादन काढले असून मार्केट यार्ड बाजारात विक्रीसाठी घेऊन आलो असतो. वीस वर्षांत यावर्षी सर्वात कमी दर मिळाला आहे. वाहतूक, मजुरी यातून यावर्षी खर्च ही निघत नाही.  रताळ्याला रात्री पाणी द्यावे लागते. यामुळे किमान यावर्षी ३५ ते ४०  रुपये भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यातुलनेत यंदा कमी भाव मिळाला आहे. त्यामुळे सद्या रताळ शेती करणे परवडत नाही. - श्रीरंग चौधरी, शेतकरी ,माजरगाव करमाला.

 रोगप्रतिकारक शक्ती वाढीसह आरोग्यविषयक अनेक फायदे 

नवरात्रोत्सवासह आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र, कार्तिकी एकादशी या दिवशी बहुतांश भाविक उपवास करत असतात. मात्र नवरात्रोत्सवात  नऊ दिवस उपवासासाठी रताळीला जास्त मागणी असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसह आरोग्यविषयक अनेक फायदे रताळी खाण्याने होत असल्याने  दिवसात अधिक मागणी असते. - अमोल घुले, आडते, मार्केट यार्ड

Web Title: Heavy arrival of yam at market yard during Navratri Festival This year the price is 20 to 30 rupees per kilo while the income is doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.