Maharashtra Temperature: महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट
By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 20:28 IST2025-03-12T20:28:16+5:302025-03-12T20:28:33+5:30
राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर

Maharashtra Temperature: महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट
पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आली असून बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्यालयाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे. राज्यात बुधवारी (दि. १२) सर्वाधिक ४१.४ अंश सेल्सिअस तापमानअकोला येथे नोंदविण्यात आले. पुण्यातही तापमानाने चाळिशी ओलांडली असून लोहगाव तसेच कोरेगाव पार्क येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णतेच्या लाटेमुळे सरासरी कमाल तापमान तीन ते सहा अंशांनी वाढले असून किमान तापमानातही दोन ते चार अंशांची वाढ दिसून येत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे १६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असल्यामुळे तसेच उत्तरेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी विदर्भातील तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या वर पोचले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर पोचले आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आले. तर जळगाव, सोलापूर या ठिकाणी पारा ४० अंशांच्या जवळ पोचला आहे. कमाल सरासरी तापमानात तीन ते सहा अंशांची वाढ झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. किमान तापमानातही सरासरीपेक्षा दोन ते चार अंशाने वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे एसी, कुलर व फॅन लावावे लागत आहेत. परिणामी राज्यात विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर व अकोल्यात गुरुवारी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील बुधवारी विविध शहरात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअस)
पुणे ३८.२
लोहगाव ४०.२
जळगाव ३९.४
कोल्हापूर ३६.५
महाबळेश्वर ३२.१
नाशिक ३८.७
सांगली ३८.१
सातारा ३७.९
सोलापूर ३९.४
मुंबई ३७
सांताक्रुज ३८.६
रत्नागिरी ३८.४
डहाणू ३४.८
संभाजीनगर ३८.२
परभणी ३९.१
अकोला ४१.३
अमरावती ३९.८
बुलढाणा ३८.२
ब्रह्मपुरी ४०.४
चंद्रपूर ४०.६
गोंदिया ३८.२
नागपूर ४०.२
वाशिम ३९.८
वर्धा ४०
यवतमाळ ४०
पुण्यातील तापमान
शिवाजीनगर ३८.२
पाषाण ३८.२
लोहगाव ४०.२
चिंचवड ३९.१
लवळे ३७.९
मगरपट्टा ३८.३
कोरेगाव पार्क ४०.२
एनडीए ३७.५