हृदय हेलवाणारी घटना..! वडिलांसोबत चिमुकले शाळेत जाण्यासाठी निघाले अपघातात तिघांनवर काळाचा घाला       

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:11 IST2025-01-06T19:06:04+5:302025-01-06T19:11:28+5:30

शिक्रापूर - चाकण महामार्गावर अपघात झाला असून याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

Heartbreaking incident..! Three children killed in accident as they were going to school with their father | हृदय हेलवाणारी घटना..! वडिलांसोबत चिमुकले शाळेत जाण्यासाठी निघाले अपघातात तिघांनवर काळाचा घाला       

हृदय हेलवाणारी घटना..! वडिलांसोबत चिमुकले शाळेत जाण्यासाठी निघाले अपघातात तिघांनवर काळाचा घाला       

शिक्रापूर : शिक्रापूर चाकण रोडवर पिंपळेजगताप येथे भीषण अपघातात मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला एका ट्रकने चिरडले. यात वडिलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

गणेश संजय खेडकर (वय ३५ रा. पिंपळेजगताप ता. शिरूर )तन्मय गणेश खेडकर (वय ९ वर्ष )आणि शिवम गणेश खेडकर(वय ५ वर्ष )अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावं आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. शिक्रापूर - चाकण महामार्गावर अपघात झाला असून याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालक ज्ञानेश्वर जीवन रणखांब (वय ३५ रा. सोनेगाव ,उस्मानाबाद ) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, शिक्रापूर - चाकण महामार्गावर सकाळी खेडकर हे आपल्या दोन चिमुकल्याना घेऊन एम एच १२ आर डब्ल्यू २१४६ दुचाकीने शाळेत सोडवण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रक एम एच १३ ए एक्स ३७३२या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या अपघातानंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत पुढील ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत आला असून पुढील तपास शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Heartbreaking incident..! Three children killed in accident as they were going to school with their father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.