शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:53 IST

Rajgad Fort Trekking Accident: संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली

किरण शिंदे 

पुणे: राजगड किल्ल्यावर गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय विवाहित तरुणीचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला झालेला हा दुर्दैवी प्रकार अधिकच भावनाद्रावक ठरला आहे. मृत तरुणीचे नाव कोमल सतीश शिंदे (वय २०, रा. आळंदी, पुणे) असे आहे. ती आपल्या पतीसोबत ट्रेकिंगसाठी राजगडावर आली होती. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना कोमलचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर तिच्या पतीने तात्काळ आजूबाजूच्या ट्रेकर्सकडे मदत मागितली व वेल्हे पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस जवान युवराज सोमवंशी, आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले आणि गणेश सपकाळ यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर कोमलचा मृतदेह खाली आणला. रात्री उशिरा तिला वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद वेल्हे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून, घटनास्थळाच्या आजूबाजील परिस्थितीचा, साक्षीदारांचा व पतीच्या जबाबाचा आधार घेत पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 

टॅग्स :PuneपुणेFortगडTrekkingट्रेकिंगShivrajyabhishekशिवराज्याभिषेकDeathमृत्यूAccidentअपघात