शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST

इंदापूर: ऊसतोड मजूर हा स्थलांतरित होणारा मजूर असून त्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. ऊसतोड मजूर हा ...

इंदापूर: ऊसतोड मजूर हा स्थलांतरित होणारा मजूर असून त्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. ऊसतोड मजूर हा गोरगरीब कुटुंबातील आहे. त्याच्या हाताला काम नसताना जर तो आजारी पडला तर त्याने उपचार कुठे करायचे, हा त्याच्यापुढे पडलेला मोठा प्रश्न असतो. मात्र अशा परिस्थितीत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले हे देशासाठी एक मॉडेल प्रोजेक्ट आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व नवीन वर्षानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र रविवारी (दि.३) सुरू करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, भागवत गटकूळ, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, कर्मयोगीचे संचालक अतुल व्यवहारे, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोरमले, माया विंचू, अशोक इजगुडे, अरविंद वाघ आदी उपस्थित होते.

या प्राथमिक आरोग्य केंद्रातून नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना चालू गाळप हंगामात ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसाठी विनाशुल्क सेवा दिली जाणार आहे. ऊसतोड मजुरांना व कामगार यांना प्राथमिक उपचार सर्दी, खोकला, ताप, चक्कर, उलटी, थंडी, जखम, ड्रेसिंग, बीपी तपासणी विविध तपासण्या करण्याची सेवा डॉ. वर्षा बोराडे, डॉ. भाग्यश्री चव्हाण, डॉ. अनुजा कुदळे या देणार आहेत. स्वराज्य ग्रुप विकास प्रतिष्ठानच्या वतीने कर्मयोगी कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचे जाहीर केले.

प्रास्ताविक संस्थेचे सचिव तुषार रंजनकर यांनी केले. आभार किरण खंडागळे यांनी मानले.

————————————————————

प्राथमिक आरोग्याचे केंद्राचे उदघाटन करताना हर्षवर्धन पाटील व इतर.

०७०१२०२१-बारामती-१८