भुगाव येथे सातशे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:28+5:302021-02-05T05:08:28+5:30
यामध्ये नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी आणि मोफत चष्मे देण्यात आले. या कार्यक्रमात ३६७ जणांची नेत्र ...

भुगाव येथे सातशे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
यामध्ये नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी आणि मोफत चष्मे देण्यात आले.
या कार्यक्रमात ३६७ जणांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले. नेत्र तपासणीत १८ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. ३४० जणांची शुगर आणि रक्तदाब तपासणी करून घेण्यात आली.
यावेळी भूगावच्या सरपंच निकिता रमेश सणस, उपसरपंच सतीश इंगवले, उपसरपंच विशाल भिलारे सदस्य अर्चना सुर्वे, वैशाली चोंधे, पार्वती शेडगे, वैशाली सणस, सुनीता पोळ, सुरेखा शेडगे, सविता खैरे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, जमनादास इंगवले, स्वस्तिक चोंधे, शंकर शेडगे, दीपक करंजावणे, जितेंद्र इंगवले, कैलास चोंधे, गुलाब चोंधे, रमेश सणस, जीवन कांबळे, मुकुंद फाळके, सोपान सुर्वे, संकेत कांबळे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर, आरोग्य सेवक राहुल तायडे आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक - २९पौड आरोग्य शिबिर
फोटो- भूगाव (ता. मुळशी) येथे आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी उपस्थित.