मुख्याध्यापक संघ शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:01+5:302021-09-02T04:24:01+5:30

पुणे : जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत बहुतांश सर्व मुख्याध्यापक सकारात्मक आहेत. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आणि कोरोनाविषयक ...

The headmaster team is positive about starting the school | मुख्याध्यापक संघ शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक

मुख्याध्यापक संघ शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक

पुणे : जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत बहुतांश सर्व मुख्याध्यापक सकारात्मक आहेत. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आणि कोरोनाविषयक नियमावलींचे पालन करून राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, याबाबत बुधवारी पुण्यात मुख्याध्यापक संघातर्फे बैठक घेतली जाणार आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा सुमारे दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्यावर मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थी व पालक ऑनलाईन शिक्षणाला वैतागले आहेत. केव्हा शाळा सुरू होतात, या प्रतीक्षेत सर्व आहेत. तसेच शाळा सोडून इतर सर्व ठिकाणी विद्यार्थी व पालक फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या परिसरातील शाळा सुरू कराव्यात, अशी भूमिका मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले की, बुधवारी जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्यात कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व मुख्याध्यापक शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत यापूर्वी प्रसिध्द केलेल्या नियमांचे पालन करून शाळा सुरू व्हाव्यात, अशी मुख्याध्यापकांची भावना आहे. त्यावर या बैठकीत चर्चा बुधवारी (दि. १) करून शिक्षण विभागाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: The headmaster team is positive about starting the school