he send Anna and Shevanta's photos to office colleague and she filed molestation complaint | अण्णा आणि शेवंताचे फोटो पडले महागात ; तो गेला थेट तुरुंगात 
अण्णा आणि शेवंताचे फोटो पडले महागात ; तो गेला थेट तुरुंगात 

पुणे : कनिष्ठ महिला सहकारी महिलेला अण्णा आणि शेवंता या पात्रांचे फोटो पाठवणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला महागात पडले असून त्याच्या विरोधात थेट विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी  उत्तम शिवाजी साळवी या होमगार्ड समुपदेशकाला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला होमगार्ड म्हणून फुलेनगर येथील कार्यालयात कामाला आहे तर आरोपी उत्तम साळवी हा शहर समुपदेशक म्हणून तेथे काम करतो. आरोपी साळवी वारंवार फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान त्याने खासगी मराठी वाहिनीवरील प्रसिध्द मालिका 'रात्रीस खेळ चाले' मधील पात्र अण्णा आणि शेवंता यांच्या  मिठीचे छायाचित्र मोबाईवरुन पाठवले. त्याखाली 'प्रेमाला वय नसते' हेही लिहून पाठवले. फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी तिच्याकडे वाईट नजरेने वारंवार बघत असल्याचे तक्रारीत म्ह्टले आहे. इतकेच नव्हे तर 'माझ्या बरोबर फिरायला चल' म्हणत  मनाप्रमाणे वागली नाहीस तर मी तुला कामावरुन काढून टाकेल अशीभीती दाखवत होता. ही घटना मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान घडली. अखेर या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते करत आहेत.

Web Title: he send Anna and Shevanta's photos to office colleague and she filed molestation complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.