शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Irrfan Khan Passed away: ‘त्या’च्या कॅमेऱ्याला अँजेलीना जोली गवसली नाही पण इरफान खान सापडला.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 19:00 IST

चौदा वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाची बातमी चांगलीच गाजली होती.

ठळक मुद्देपुण्यातील अँजेलीनाच्या वास्तव्यावर एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्याने केली होती डॉक्युमेंटरी अँजेलीना रिक्षेतून फिरत असल्याचा फोटो व्हायरल

पुणे: चौदा वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाची बातमी चांगलीच गाजली होती...त्या चित्रपटाचे नाव होते ' द माईटी हार्ट'. या चित्रपटामध्ये हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलीना जोली, ब्रॅड पिट यांच्यासमवेत अभिनेता इरफान खान देखील प्रमुख भूमिकेत झळकला होता..आणि या चित्रपटाचे काही चित्रीकरण हे औंध परिसरात झाले होते..त्यासाठी हे तिघे काही दिवस पुण्यात वास्तव्यास होते. त्यावेळी अँजेलीना रिक्षेतून फिरत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता..त्या संपूर्ण पुण्यातील तिच्या वास्तव्यावर एफटीआयआय चा माजी विद्यार्थी सौरभ डे याने डॉक्युमेंटरी केली होती..यामध्ये त्याला अँजेलीना गवसली नाही पण इरफानचा संवाद मात्र कैद झाला.    ही घटना आहे 2006 ची. इरफान खान या चित्रपटात कराचीच्या पोलीस प्रमुखाच्या भूमिकेत होता. सशक्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी या चित्रपटात जागा मिळविली.डॅनियल पर्ल या अमेरिकन पत्रकाराचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली होती. यावर चित्रपटाचे कथानक बेतले होते. पाकिस्तानात या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी न मिळाल्याने कराची सारखा सेट पुण्यातील औंध परिसरात उभारण्यात आला होता़. या चित्रपटातील इरफान खान याच्या भूमिकेचे बहुतांश शुटींग पुण्यात झाले होते़ तेव्हा हे तिघे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. अँजेलीना जोली आणि ब्रॅड पिट  यांचे छायाचित्र टिपण्यासाठी देशपरदेशातील पापाराजी पुण्यात आले होते़  दोघांचे फोटो मिळावेत व त्यांच्या शुटींगची माहिती मिळाली, यासाठी पुण्यातील पत्रकारांचीही मोठी धावपळ उडत होती़ त्यामुळे शुटींगसाठी बाहेर पडताना ते नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवित. कधी हॉटेलमधून सामान नेण्यात येणा-या लिफ्टने मागच्या बाजूने ते उतरत़ तर कधी रिक्षातून प्रवास करत असे़ एकदा  ते असेच रिक्षातून प्रवास करतानाचा फोटो मिळाला होता. इरफान खानच्या निधनानंतर या चित्रपटाची  अनेकांना झाली...मात्र इरफान खान या चित्रपटात होता याकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली..............' द माईटी हार्ट' या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात झाले होते. त्यासंदर्भात अँजेलीना आणि ब्रॅड पिट यांच्यासमवेत इरफान खान देखील पुण्यात आला होता. ते दोघे पुण्यात माध्यमांना चुकवून कसे फिरायचे यावर एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्याने ' चेसिंग अँजेलीना' यावर डॉक्युमेंट्री केली होती..त्यात त्याने इरफान खान यांच्याशी संवाद साधला असल्याचे आठवते- चंद्रशेखर जोशी, माजी जनसंपर्क अधिकारी एफटीआयआय......

एफटीआयआयचे विद्यार्थी झेड.आर अंजन आणि मनोज नायर यांच्या 1990 सालच्या ' मॉर्निंग' या डिप्लोमा फिल्ममध्ये अभिनेता इरफान खान याने भूमिका केली असल्याची माहिती चंद्रशेखर जोशी यांनी दिली...... 

 

टॅग्स :PuneपुणेbollywoodबॉलिवूडIrfan Khanइरफान खानDeathमृत्यूHollywoodहॉलिवूडcinemaसिनेमा