हवेली तहसीलदारांच्या वाहनचालकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:44 IST2021-06-17T21:42:53+5:302021-06-17T21:44:29+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हवेली तहसीलदारांच्या वाहनचालकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
पिंपरी : हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या वाहन चालकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. जुनी सांगवी येथे गुरुवारी (दि. १७) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
अरुण मधुकर दीक्षित (वय ५० रा. जुनी सांगवी), असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच त्यांच्या घरात सुसाईड नोट देखील मिळाली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दीक्षित यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.