शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

हवेली पोलीस ठाण्याचा पुणे शहर आयुक्तालयात होणार समावेश; प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 1:40 PM

हवेली तालुक्यातील १७ गावे ही पुणे शहर पोलीस दलात येण्याची शक्यता..

ठळक मुद्देनांदेड सिटीमध्ये १५ गुंठे जागाही उपलब्ध  हवेली पोलीस ठाण्यांतर्गत नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे आदी १७ गावांचा समावेश

कल्याणराव आवताडे -पुणे : सिंहगड रस्त्यावरील असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्याचे पुणे शहर आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून हवेली तालुक्यातील १७ गावे ही पुणे शहर पोलीस दलात येण्याची शक्यता आहे. हवेली पोलीस ठाण्यासाठी नांदेड सिटी येथे १५ गुंठे जागाही उपलब्ध करण्यात आली आहे.

शहरालगत असणाऱ्या गावांत वाढत्या लोकसंख्येचा ताण वाढतो आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. लोणीकाळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्याबरोबरच हवेली पोलीस ठाण्याचा समावेश करण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

हवेली पोलीस ठाण्यांतर्गत नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे आदी १७ गावांचा समावेश असला तरी यातील किती गावे हि नव्याने पुणे आयुक्तालयात येणार हे गुलदस्त्यात असले तरी हि गावे शहरालगत असून या गावांचे शहरीकरण होत आहे. स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून अनेक नोकरदारांनी या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यांची समस्या, वाहतुकीची समस्या निर्माण होत असून या भागांचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत आहे. सिंहगड किल्ला,खडकवासला धरण आदी पर्यटन क्षेत्र असल्याने परिसरात पर्यटकांची संख्या अधिक असते. बऱ्याचदा गुन्हेगार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार होतात. यावेळी तपास कामात शहर पोलिसांना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर हवेली पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस दलाला जोडल्यास गावांच्या विकासाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. पुणे शहराचा विस्तार पाहता आणखी एका परिमंडळाची आवश्यकता असून शहर पोलीस दलातील विभागाची फेररचना करण्यात येणार असल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ग्रामीण पोलीस दलात समावेश असणारे हवेली पोलीस ठाणे हे अभिरुची मॉल समोर असले तरी लवकरच हवेली पोलीस ठाणे हे नांदेड सिटी येथील प्रशस्त जागेत हलविण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस