आज नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९३ इतकी असून आज ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत २३७५७ एकूण कोरोनाबाधित रुग्ण हवेली तालुक्यात सापडले, त्यापैकी २१४५० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजमितीला १९२९ रुग्ण विविध ठिकाणी औषधोपचार घेत आहेत आणि त्यापैकी १० रुग्णांची स्थिती गंभीर आहे. सुमारे १४०९ रुग्ण घरीच विलगीकरणात राहून औषधोपचार घेत आहेत. आज तालुक्यातील ६ रुग्ण कोरोनाने दगावले असून आज अखेर तालुक्यात सुमारे ३८८ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ९०.२८ टक्के इतके आहे तर मृत्यू दर १.६३ टक्के आणि तालुक्यातील सक्रिय कन्टेमेंट झोनची संख्या ८४६ इतकी असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}