शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

फेट्यांनी घातली पालिकेला ‘टोपी’

By admin | Updated: June 13, 2014 04:56 IST

निमंत्रित मान्यवरांना पालिकेकडून भाडे कराराने घेऊन बांधण्यात आलेले फेटे सुमारे ९0 निमंत्रितांनी परत न केल्याने या फेट्यांचे सुमारे ४९ हजार ५00 रुपये मोजण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.

पुणे : तब्बल तीन कोटी रुपये खर्चून महापालिका भवनातील नूतनीकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या उद्घाटनासाठी बोलाविण्यात आलेल्या मान्यवरांच्या कृपेने महापालिकेस ५0 हजार रुपयांचा भुर्दंड पडला आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या निमंत्रित मान्यवरांना पालिकेकडून भाडे कराराने घेऊन बांधण्यात आलेले फेटे सुमारे ९0 निमंत्रितांनी परत न केल्याने या फेट्यांचे सुमारे ४९ हजार ५00 रुपये मोजण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. विशेष म्हणजे या अनपेक्षित खर्चास नुकतीच स्थायी समितीनेही कोणताही गाजावाजा न करता मान्यताही दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पालिकेने नूतनीकरण केलेल्या या सभागृहाचे उद्घाटन आणि शारदाबाई पवार शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन १७ जानेवारी २0१४ रोजी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या शहराचे खासदार, आमदार, तसेच महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका यांना फेटे बांधण्याची व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार सुमारे २00 मान्यवरांना फेटे बांधण्याचे काम एका ठेकेदारास देण्यात आले होते. हे फेटे एका दिवसासाठी फेटा बांधणीसह २५0 रुपये या दराप्रमाणे भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर सुमारे ११0 मान्यवरांनी हे फेटे परत केले, पण ९0 मान्यवर हे फेटे चक्क घरीच घेऊन गेले. यामुळे या फेट्यांच्या भरपाईपोटी प्रतिनग ५५0 रुपये (फेट्याच्या बांधणीसह) ठेकेदारास द्यावे लागणार आहेत. ही रक्कम सुमारे ४९ हजार रुपये ५00 रुपये आहे. त्याचा भुर्दंड विनाकारण महापालिकेस सहन करावा लागणार आहे. ही रक्कम संबंधित ठेकेदारास देण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली असून, या कार्यक्रमासाठीचे फेट्यांचे बिल ८९ हजार २५0 रुपये आहे. (प्रतिनिधी)