शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:36 IST

रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते.

कल्याणराव अवताडे/पांडुरंग मरगजे 

धायरी/धनकवडी : कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावर गुरुवारी (दि. १३) भीषण अपघात झाला. यात ८ जणांनी जीव गमावला, तर काही जण गंभीर जखमी झाले. यापूर्वीही येथे अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नवले पुलावरून वाहन चालवणे जीवघेणे ठरत आहे.

बंगळुरू-मुंबई बाह्यवळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पुलाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाल्यानंतर हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. हा महामार्ग २४ तास व्यग्र असतो. बरोबर तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच अशी दुर्दैवी घटना घडली होती, त्यामध्ये तब्बल ४७ गाड्यांचं नुकसान झाले होते, तेव्हा पासून नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. तरीही प्रशासन ढिम्म राहिले आहे. तात्पुरत्या उपाययोजना केल्या की बस. पण वेगाने येणाऱ्या गाड्या कोण थांबवणार? अपघातांची ही मालिका कधी थांबणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

शासनाची निष्क्रियता, अधिकाऱ्यांची बेपर्वाई आणि योजनेतील तांत्रिक चुका यामुळे हा रस्ता आजही असुरक्षितच आहे. उताऱ्यामुळे वाहनांचा वेग आपोआप वाढतो. याचा फटका नागरिकांना बसत असून कोट्यवधी रुपयांचा दंड या एकाच ठिकाणी नागरिकांवर बसवला गेला आहे, असे डॉ. संभाजी मांगडे यांनी सांगितले.

नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न

१) इतका तीव्र उतार सुरुवातीलाच का ठेवला? कमी का करता आला नाही?२) रस्ता डिझाईन करताना योग्य तपासणी झाली का?३) इंजिनिअरिंग विभागाने हा उतार सुरक्षित आहे का, याचे मूल्यमापन केले का?४) नागरिकांच्या जीवापेक्षा रस्ता लवकर उघडणे का महत्त्वाचे ठरले?५) चुकीच्या रचनांची जबाबदारी कोण घेणार?

उपाय काय आहेत?

• उताराचे पुनर्निर्माण किंवा ग्रेड कमी करणे.• वेगमर्यादा वास्तव परिस्थितीनुसार बदलणे.• ब्रेकिंग झोन व रंबल स्ट्रिप्स बसवणे.• चेतावणी फलक वाढवणे.• चुकीचे दंड रद्द करणे व पुनर्पडताळणी करणे.

रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते. वाहतूककोंडी आणि लांबलचक रांगांमुळे जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले असताना. या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? अशी स्थिती आहे. पीएमआरडीए व एमएसआरडीसीचे रिंग रोड होणार या घोषणा ऐकत पंधरा वर्षे वाया गेली. तरीही सरकारांचा निगरगट्टपणा तसूभरही ढळला नाही. - ॲड. संतोष बाठे

English
हिंदी सारांश
Web Title : Katraj-Navale Bridge Road: A Death Trap Claiming Lives, Demanding Action

Web Summary : The Katraj-Navale Bridge road has become a death trap due to frequent accidents. Negligence, flawed design, and excessive speed contribute to the danger. Citizens question the steep slope and demand immediate safety improvements, including speed reduction and road redesign.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिसhighwayमहामार्गMONEYपैसा