शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिके जळाली, पाणी योजना कोलमडल्या

By admin | Updated: September 4, 2015 01:56 IST

इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तलाव कोरडे पडले आहेत. भादलवाडी, पोंधवडी, पळसदेव, मदनवाडी तलावांमधील पाणीसाठी संपला आहे.

पळसदेव : इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तलाव कोरडे पडले आहेत. भादलवाडी, पोंधवडी, पळसदेव, मदनवाडी तलावांमधील पाणीसाठी संपला आहे. त्यामुळे या तलावांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना, शेती अडचणीत आली आहे. तसेच भादलवाडी तलावावर अवलंबून असणारा मासेमारी व्यवसायही संकटात आला आहे. इंदापूर तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीचे चक्र कोलमडून गेले आहे. उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. अल्पपाण्यावर शेतीची तहान भागवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांजवळ पुरेसा पाणीसाठा आहे परंतु वाढत्या भारनियमनामुळे शेतीला पाणी देता येत नाही. तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटला आहे. तलावांमधील खड्ड्यांमध्ये आता पाणी शिल्लक राहिले आहे. भादलवाडी तलावामध्ये फक्त चारच दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती व मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पाणीसाठा संपू लागल्याने मासे पकडण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू आहे. मागील चार महिन्यांपासून खडकवासला तलावामधून या तलावात पाणीच न सोडल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. तलावालगतची पिके जळू लागली आहेत. तलावांमधील पाणी संपल्याने पाणी योजनाही अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहेत. शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट पाहात आहेत.